‘बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. स्पर्धकांमध्ये भांडण, तंटे, राडा आता होताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये पर्वाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असलेलं नाव म्हणजे किरण माने. किरण माने यांचं या घरातील स्पर्धकांशी असलेलं भांडण, मैत्री तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता त्यांनी ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये प्रत्येक स्पर्धकांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. कॉलेज स्पेशल थीम असलेल्या आठवड्यामध्ये घरातील स्पर्धकांना त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण झाली. यावेळी किरण यांनीही आपल्या महाविद्यालयात असताना झालेलं प्रेम याबाबत खुलासा केला.

खेडेगावातून आलेले किरण जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा इंग्रजी माध्यमातील मुलांसमोर काय बोलायचं हा प्रश्न त्यांना पडायचा. महाविद्यालयात असताना त्यांना एक मुलगी आवडायची. पण ती इंग्रजी भाषेमध्येच संवाद साधायची. एकांकिका व नाटकांमध्ये ते काम करत असल्यामुळे त्या मुलीशी त्यांची मैत्री झाली.

आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बोलताना किरण म्हणाले, “मला ती मुलगी आवडू लागली होती. तेव्हा माझा मित्र संत्याने तिला जाऊन सांगितलं की, किरण लव्ह्ज यू. तेव्हा तिने त्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं की तो मला ओळखतो (he knows me). तिच्या उत्तरानंतर संत्या माझ्याकडे तोंड पाडून आला. त्याला असं वाटलं की ती नो म्हणजेच नाही बोलली आहे. मी त्यावेळी रात्रभर खूप रडलो. पण नंतर तिच्याकडूनच कळलं की तो नकार नव्हता. तेव्हा मी खूप खूश झालो.” पण नंतर किरण व त्या मुलीमध्ये रिलेशनशिप होतं का याबाबत मात्र त्यांनी बोलणं टाळलं.