‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर सध्या ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेमधून अक्षय अगस्त्यच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेतील अक्षयची भूमिका अल्पवधीत घराघरात पोहोचली असून प्रेक्षकांचा मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच अक्षयने त्याच्या नव्या घराची पहिली झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.

गेल्या वर्षी अभिनेता अक्षय केळकरने म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. या सोडतीमध्ये अक्षय विजेता ठरला आणि त्याला हक्काचं घर मिळालं. याच हक्काच्या घराचा व्हिडिओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “लवकरच माझ्या नव्या घराची पूर्ण झलक तुम्हाला दाखवेन,” असं कॅप्शन लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी लग्नानंतर घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला आकर्षक अशी नेमप्लेट दिसत आहे. एका मोठ्या चावीवर अक्षय केळकर असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर अक्षयचं आतील सुंदर घर दिसत आहे. त्याने रेखालेले चित्र पाहायला मिळत आहेत. तसंच घरातून मायनगरी मुंबईचं दृश्य दिसत आहे. ढगांनी भरलेलं आभाळ, उंच इमारती, उड्डाणपूल असं सुंदर असं मुंबईचं दर्शन अक्षय केळकरच्या घरातून होतं आहे. विशेष म्हणजे त्याच्या नव्या घराच्या दरवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जुन्या काळी असायचा तसा लाकडी दरवाजा अक्षयच्या नव्या घराला आहे. शेवटची छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळत आहे. अक्षयच्या घराची ही पहिली आणि छोटीशी झलक असून लवकरच तो संपूर्ण घर दाखवणार आहे.

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

अक्षयच्या नव्या घराचा व्हिडीओ पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नवी घर अभिनंदन”, “खूप खूप सुंदर घर”, “कमाल भाई”, “खूप छान”, “घर खूप भारी वाटतं आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याचं मॅशअप पाहिलंत का? त्यांची लेक गार्गी फुले पाहून म्हणाल्या, “कमाल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘अबीर गुलाल’ मालिकेआधी ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी त्याने पेलली होती. तसंच अक्षयने हिंदी मालिकेतही काम केलं. शिवाय तो ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये समृद्धी केळकरबरोबर पाहायला मिळाला होता.