Bigg Boss Marathi Season 5 : शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या पर्वातील गाजलेल्या सदस्यांनी उपस्थित लावली. दुसऱ्या पर्वातील डॉ. अभिजीत बिचुकले, पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वातील राखी सावंत हे खास पाहुणे म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाले. या खास पाहुण्यांनी आपापल्या शैलीत सदस्यांचं कौतुकही केलं आणि टीका देखील केली. यावेळी अभिजीत बिचुकलेंनी घरात येताच हंगाम केला.

‘बिग बॉस’ घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी अभिजीत यांनी वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंतचं कौतुक केलं. त्यानंतर निक्कीचं देखील कौतुक करत तिने वरिष्ठ कलाकारांचा अपमान केल्यावरून सुनावलं. तसंच इन्फ्लुएन्सर म्हणण्यावरून अभिजीत बिचुकलेंनी नाव न घेता धनंजय, अंकिता यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी पंढरीनाथ बिचुकल्यांची शाळा घेताना दिसला. यानंतर घरातील दोन अभिजीतमध्ये गाण्याची जुगलबंदी रंगली. याचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: “…ऐ बच्च्या तुझाचं मी बाहुबली”, सुबोध भावेने सूरज चव्हाणची केली हुबेहूब नक्कल, पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये, बिग बॉस म्हणतायत की, या घरात आता दोन अभिजीत आहेत. एक कधीच चुकले नाहीत. तर दुसरे बिचुकलेच आहेच. या दोघांची गाण्याची एक जुगलबंदी झालीच पाहिजे. यावेळी दोघांनी मोहम्मद रफी यांचं ‘तू इस तरह से मेरी जिन्दगी में’ हे गाणं गायलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “बिनचुकलेले बिचुकले चुकून पृथ्वीवर आले.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, बाकी काही असो. पण आत्मविश्वास तर बिचुकलेंसारखा पाहिजे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आवाज नाही…काही नाही…ओव्हर आहे बिचुकले”. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बिचुकलेंचे सूर चुकले.’

Comments
Comments

हेही वाचा – Video : ‘नगं थांबू रं…’, मनाला भिडणारं ‘पाणी’ चित्रपटातील शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण बेघर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.