Ankita Prabhu Walawalkar Engagement : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरातून पोहोचलेली अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल, १३ फेब्रुवारीपासून तिच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंकिताचा काल मेहंदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आज तिचा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने पार पडला. अंकिताच्या साखरपुड्याचा फोटो नुकताच समोर आला आहे.

अंकिता वालावलकरच्या साखरपुड्याचा फोटो ‘गोष्ट कोकणातील’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. “साखरपुडा कोकणातल्या गोड परीचा” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या साडीत अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता सेटवर प्रिंटेड जॅकेट घातलं आहे.

Photo Credit - Goshta Kokanatli
Photo Credit – Goshta Kokanatli

दरम्यान, डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारने नुकताच अंकिताच्या साखरपुड्यातील विधीच्या आधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ‘मेरे यार की शादी है’ गाणं लावलं आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत धनंजय पोवारने लिहिलं की, जाम खुश असा.

धनंजयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता आणि तिचे आई-वडील विधीसाठी बसलेले पाहायला मिळत आहे. यावेळी अंकिता वेगळ्या लूक दिसत आहे. तिने अंजिरी रंगाच्या शेडमधली साडी नेसली आहे, ज्यावर तिने हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस परिधान केला आहे. या लूकमध्येही अंकिता फारच छान दिसत आहे.

माहितीनुसार, उद्या, १५ फेब्रुवारीला अंकिता वालावलकरला हळद लागणार आहे. तर १६ फेब्रुवारीला अंकिता कुणालशी लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. मोठ्या थाटामाटात अंकिता आणि कुणालचं लग्न देवबाग येथे पार पडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कोण आहे?

अंकिताच्या होणार्‍या नवऱ्याचं पूर्ण नाव कुणाल भगत आहे. तो लोकप्रिय संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केली आहेत.