‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वातील स्पर्धकांनी ‘बिग बॉस मराठी’चं घर अक्षरशः डोक्यावर घेतलं. पहिल्या दिवसांपासून या पर्वात वाद पाहायला मिळाले. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने झाले आहेत, मात्र चर्चा अजूनही कायम आहे. या पर्वातील स्पर्धक आता नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहायला मिळतात. या पर्वातील ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकरने नुकताच एक रील व्हिडीओ शेअर केला आहे.

‘बिग बॉस मराठी’ झाल्यापासून जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी फोटो, रील व्हिडीओ शेअर करत असते. ‘बिग बॉस’नंतर आज पहिल्यांदाच जान्हवीने लेकाबरोबर रील व्हिडीओ केला आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “कानाखाली देईन, तू हृतिक रोशन नाहीये”, कशिश कपूर अविनाश मिश्रावर भडकली, नेमकं काय घडलं? वाचा…

जान्हवी किल्लेकरच्या लेकाचं नाव इशान किल्लेकर असं असून तो आठ वर्षांचा आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी आणि इशान सुशांत सिंह राजपूत-अनुष्का शर्माच्या ‘चार कदम’ गाण्यावर रील व्हिडीओ करताना दिसत आहेत. मायलेकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसंच अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला जान्हवीने चांगलंच उत्तर दिल्याच पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “जान्हवी ताई फिल्टर लावला नाही का?” यावर जान्हवी उत्तर देत म्हणाली, “फिल्टरची गरज नाहीये.” तसंच इतर नेटकऱ्यांनी “तुमचा मुलगा खूप गोड आहे”, “मुलगा खूप छान आहे आणि आई पण खूप गोड आहे”, “संतुर मॉम”, “आईची शान इशान”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: चुम दरांग झाली नवी ‘टाइम गॉड’, घरात झाला राडा; करणवीर मेहरा-रजत दलालमध्ये जोरदार भांडण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवी किल्लेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती, जी चांगलीच गाजली. तसंच जान्हवीने अल्बम साँगमध्ये काम केलं होतं.