‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलं गाजलं. या पर्वाने ‘कलर्स मराठी’ला आतापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी मिळवून दिला. अजूनही ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या पर्वात झळकलेले स्पर्धक नेहमी चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसांपासून चर्चित असणारी स्पर्धक होती निक्की तांबोळी. निक्की तांबोळीवर वादग्रस्त वक्तव्यामुळे बरीच टीका झाली. पण, तिने तिच्या खेळाने, युक्तीने अनेकांची मनं जिंकली. त्यामुळेच निक्की ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वाची टॉप-३ स्पर्धक ठरली.

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने झाले आहेत. तरीही निक्की तांबोळी खूप चर्चेत असते. कधी अरबाज पटेलबरोबर असलेल्या नात्यामुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हॉट, बोल्ड फोटोमुळे निक्की चर्चेचा विषय असते. लवकरच निक्की तांबोळी एका लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे”, सलील कुलकर्णींची लेकीसाठी सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”

निक्की तांबोळी ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात निक्कीसह उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, दीपिका कक्कड असे बरेच प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय दिग्दर्शक फराह खान सांभाळणार आहे. तसंच रणवीर बरार, विकास खन्ना परीक्षण करणार आहेत. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची कधीपासून सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

हेही वाचा – Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

हेही वाचा – ‘कलर्स मराठी’वरील मालिकांचा २३ डिसेंबरला रंगणार विशेष भाग; ‘अशोक मा.मा.’मध्ये येणार ट्विस्ट, तर ‘इंद्रायणी’ मालिकेत….

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचा प्रोमो पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तेजस्वी, दीपिका, निक्कीला पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच या कार्यक्रमाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.