Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पाच आठवडा २६ ऑगस्टपासून सुरू होईल. आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या घरातून पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले आणि योगिता चव्हाण एलिमिनेट झाले आहेत. या आठवड्यात आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या चार स्पर्धकांपैकी कोण घराबाहेर जाणार? हे आज स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी सोशल मीडियावर एका जपानी चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आळंदीचे लोकप्रिय किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi )मध्ये झळकल्यापासून अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. या पर्वातील पहिल्या आठवड्यात ते बेघर झाले असेल तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंतच नाही तर जगभरात ते पोहोचले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ पाहणाऱ्या एका जपानी चाहत्याने पुरुषोत्तमदादांना भेटण्यासाठी थेट आळंदी गाठली. हे पाहून पुरुषोत्तमदादांना खूप आनंद झाला. याच क्षणाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: अभिजीत सावंतने रॅपिड फायर खेळताना दिली जबरदस्त उत्तरं, म्हणाला, “‘बी’ टीममधून आर्याला बाहेर काढून…”
“बिग बॉस कार्यक्रमाची लोकप्रियता…हा क्यूहे जपानचा आहे. बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचे भाग पाहून मला भेटायला आला आहे. माझे मित्र ईश्वर आणि प्रियांका यांच्याबरोबर तो भेटायला आला”, असं कॅप्शन लिहीत पुरुषोत्तमदादा पाटील यांनी जपानी चाहत्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत ते म्हणतात, “रामकृष्ण हरी…माझ्याबरोबर क्यूहे आहे. हा जपानचा आहे. त्याने काही बिग बॉसचे ( Bigg Boss Marathi ) भाग पाहिले. ते भाग पाहून तो आज मला आळंदीत भेटायला आला आहे. माझे मित्र ईश्वर आणि प्रियांका यांच्याबरोबर तो इथे आला आहे. खरं मला असं वाटतं की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून काय साध्य झालं? जर असं कोणी मला विचारलं, तर मी म्हणतो, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून असे काही मित्र माझ्या जीवनात येत आहेत. हेच साध्य झालं. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.”
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, पुरुषोत्तमदादा पाटील व त्यांच्या चाहत्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दादा तुम्ही बरंच काही कमावलं आहे. महत्वाचं तुम्ही माणूसकीही कमवली आहे”, “लय भारी महाराज”, “खूप मस्त”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.