Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गेल्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’मुळे निक्की तांबोळी ‘ए’ टीममधून बाहेर पडली. त्यानंतर तिचं अरबाजबरोबर कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. या भांडणात अरबाजने तोडफोड केली. यामुळे अरबाजला शिक्षा देखील मिळाली. कॅप्टन्सीच्या रेसमधून अरबाजला बाहेर काढण्यात आलं. एवढं सगळं होऊनही आता निक्की-अरबाजमधील वाद निव्वळताना दिसत आहेत. दोघं पुन्हा एकदा एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. अशातच निक्की व अरबाजचा एक प्रोमो खूप व्हायरल होतं आहे.

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये आर्या अरबाजला विचारते, “तिथे काचेवर ‘आय मीस यू’ का लिहिलं आहे?” त्यानंतर अरबाज काचेवर हृदय काढतो. तेव्हा अभिजीत निक्कीला सांगतो, “त्याने काचेवर हृदय काढलंय. बघितलं?” मग निक्की बघायला जाते आणि पुन्हा त्या काचेवर इंग्रजीत लिहिते की, भित्र्या अरबाज पटेलबरोबर कायम आहे. त्यानंतर आर्या अरबाजला सल्ला देत म्हणते की, तुला तिच्यापासून दूर व्हायला पाहिजे. या प्रोमोमधून निक्की व अरबाज पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. पण हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी आर्याला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये डाव पलटला, ‘बिग बॉस’ने घेतला धक्कादायक निर्णय, पाहा नवा प्रोमो

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अगं आर्या तू तुझा खेळ खेळना. तू त्या दोघांना का बघते? तू एवढी जळते का?” त्यानंतर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ते एकत्र आले तर आर्याला काय होतं?” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बालिश आर्या जळत आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आर्या त्या दोघांमध्ये एवढी का पडते? अरबाजला समवतेय. हिला मधेमधे करायची काय गरज आहे. तू फक्त तुझा खेळ खेळ.” पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आर्या तू बालिश आहेस. तू तुझ्याकडे लक्ष दे.”

हेही वाचा –Video: “या पर्वात माणुसकी नाही…”, अभिजीत सावंतच्या संदर्भातील ‘त्या’ निर्णयावरून भडकली सोनाली पाटील, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात निक्की, अभिजीत, अंकिता आणि वर्षा उसगांवकर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. पण असं असलं तरी दुसऱ्याबाजूला वॉटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात काहीतरी नवी घडणार असल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.