Bigg Boss Marathi Season 5 : रविवारी ( १५ सप्टेंबर ) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. आर्या जाधवला घराबाहेर काढलं असलं तरीही रविवारी एलिमिनेशन झालं. वैभव घराबाहेर जात असल्यामुळे अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर ढसाढसा रडू लागले. यावेळी अरबाजने रितेशला वैभवसाठी एक संधी द्यायला सांगितली. तरीही असं काही झालं नाही. अखेर जाताना वैभवने मॅच्युअल फंडचा कॉइन अरबाज आणि जान्हवी दिला. या एलिमिनेशनच्या आधी धमाल, मस्ती पाहायला मिळाली. रितेशने ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन सर्व सदस्यांना सरप्राइज दिलं. हे सरप्राइज पाहून सर्व सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले.

रितेश देशमुखने सर्व सदस्यांना कुटुंबियांचा व्हिडीओ दाखवला. यावेळी पंढरीनाथ कांबळेला लेक ग्रिष्मा कांबळेचा व्हिडीओ दाखवण्यात आला. तिने या व्हिडीओतून आपल्या बाबाला धीर दिला आणि त्याच्या खेळाचं कौतुक केलं. ग्रिष्मा नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: लेकींचा व्हिडीओ पाहून अभिजीत सावंत ओक्साबोक्शी लागला रडू, आहना आणि स्मिरा बाबाला म्हणाल्या, “तू गेमवर…”

“तू आम्हाला तो आत्मविश्वास दिला”

ग्रिष्मा कांबळे म्हणाली, “हाय बाबा, कसा आहेस? घरची अजिबात काळजी करू नको. आम्ही सगळे मजेत आहोत. खरंतर सणवारानिमित्ताने तुला एक्स्ट्रा मीस करतोय. पण मग तुझा ‘बिग बॉस’च्या घरातला एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…पुढेच शंभर दिवस काढायला आम्हाला काही हरकत नाहीये. कारण की तू आम्हाला तो आत्मविश्वास दिला आहेस. शंभराव्या दिवशी नक्की भेटूया. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे.”

Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit - Colors Marathi)
Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit – Colors Marathi)

मुलीचा व्हिडीओ पाहून पंढरीनाथ कांबळे भावुक झाला. पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, “त्यांना माहिती आहे बाबा काही चुकीचं वागणार नाही. बाबा काही चुकीचं करणार नाही. बाबा जसा आहे तसा तिकडे गेममध्ये करणार…त्यांना तो विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर मी इथे खेळतोय. मला त्यांचीही खूप आठवण येतेय. पण शंभर दिवसांनी नक्की भेटूया.” यानंतर पंढरीनाथने रितेशला मिठी मारली.

हेही वाचा – ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू, चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला, सिद्धार्थ जाधवने फोटो केले शेअर

हेही वाचा – Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली, “वर्षाताईंना अपशब्द वापरले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केला तेव्हा ग्रिष्माने बाबाच्या समर्थनार्थ भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. तिने या पोस्टमधून जान्हवीची चांगलीच शाळा घेतली होती.