Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची पहिली कॅप्टन ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर झाली आहे. यानंतर आजच्या भागात घरातल्या सगळ्या सदस्यांमध्ये बीबी करन्सीचं वाटप करून ‘बिग बॉस’कडून एकूण सात जोड्या बनवण्यात आल्या. या जोड्यांना ‘बिग बॉस’ हबमध्ये जाऊन एकमताने निर्णय घेऊन घरासाठी यंदाच्या आठवड्याची खरेदी करायची होती.

‘बिग बॉस’ने धनंजय पोवार – अरबाज पटेल, वर्षा उसगांवकर – जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण – इरिना, निक्की – घन:श्याम, योगिता चव्हाण – पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले – सूरज चव्हाण, आर्या – अभिजीत सावंत अशा एकूण ७ जोड्या बनवल्या होत्या. यामध्ये घराची कॅप्टन असल्याने अंकिता स्वतंत्र राहिली. या जोड्यांनी ‘बिग बॉस’ हबमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली.

Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
bigg boss marathi these seven contestants are nominated
Bigg Boss Marathi : घरातील एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! ‘त्या’ निर्णयामुळे नेटकरी वर्षा-अंकितावर नाराज, नेमकं काय घडलं?
MNS Leader PAddy Kamble
Ameya Khopkar : मनसे नेत्याची बिग बॉसच्या स्पर्धकासाठी खास पोस्ट; म्हणाले, “जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे…”
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर; तुमचे नाव आहे की, नाही कसे तपासणार? फाॅलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स  

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

सगळ्या जोड्यांनी आवश्यक सामानाची खरेदी केल्यावर ‘बिग बॉस’ने एक मोठा ट्विस्ट सदस्यांना सांगितला. यामुळे जवळपास सर्वांची कोंडी झाली. हा ट्विस्ट म्हणजे, कोणत्या सदस्यांनी काय-काय विकत घेतलंय याचा वापर घरात होईल का? याचा संपूर्ण विचार करून प्रत्येक जोडीला एकूण दोन जोड्यांना नॉमिनेट करायचं होतं. नॉमिनेट झालेल्या जोड्यांचं सामान ‘बिग बॉस’कडून जप्त करण्यात येणार होतं. यानुसार घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण सहा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा…”, योगिताच्या नवऱ्याची खरमरीत पोस्ट; म्हणाला…

Bigg Boss Marathi : सहा सदस्य झाले नॉमिनेट

योगिता-पॅडी यांनी अंडी विकत घेतली होती. हे दोन्ही सदस्य जास्त चर्चेत नसल्याने घरातील इतर सदस्यांनी बहुमताने अंड्यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांना नॉमिनेट केलं. यानंतर अंकिताने बाथरुम विकत घेतल्याने एकूण दोन बाथरुमची सध्या आवश्यकता नाही असा विचार करून निखिल – सूरजला घरातील इतर सदस्यांकडून नॉमिनेट करण्यात आलं. तर, निक्की आणि घन:श्यामने विकत घेतलेले बटाटे आणि टोमॅटो याशिवाय संपूर्ण आठवडा काढता येईल असा विचार करून, त्यांना देखील काही सदस्यांनी घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हे लोक घरातले गुंड…”, प्रसिद्ध निर्मात्यांनी जान्हवीसह वैभव-अरबाजला सुनावलं; म्हणाले, “अतिशय वाईट…”

bb marathi
हे सहा सदस्य झाले नॉमिनेट ( फोटो सौजन्य : जिओ सिनेमा )

‘बिग बॉस’ने दिलेल्या सगळ्या नियमांनुसार योगिता, पंढरीनाथ, निक्की, घन:श्याम, सूरज आणि निखिल असे सहा सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.