Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना घरात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला होता. दोघांची भांडणं, रुसवे-फुगवे यामध्ये घरातल्यांची झालेली फरफट यामुळे सगळेजण वैतागले होते. रितेशने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर अरबाजला विनाकारण पाठिशी घातल्याबद्दल टीम B ला जाब विचारला. अखेर रितेशने अरबाजने केलेल्या ड्रामाची क्लिप घरातल्या सर्व सदस्यांना दाखवली आणि यामुळे सगळेच थक्क झाले.

घरात सर्वांसमोर भांडणारे निक्की-अरबाज, रात्री एकटेच व्यवस्थित बोलत होते. तसेच घरातल्यांसमोर आता कसं वागायचं यावर या दोघांची चर्चा सुरू होती. वैभव आणि जान्हवीला हा व्हिडीओ पाहून सर्वात मोठा धक्का बसतो. अरबाजचं नाटक उघड झाल्यावर आता घरात सगळेजण त्याची नक्कल करू लागले आहेत. आजच्या भागात चक्क सूरज अरबाजची नक्कल करताना दिसणार आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीने मारली ‘आईSS’ अशी हाक; लेकीला शुद्धीवर आलेलं पाहून प्रतिमाचे डोळे पाणावले! पाहा हृदयस्पर्शी प्रोमो

सूरजने केली अरबाजची नक्कल

सूरज अरबाजची नक्कल करणार आहे. तर, डीपी दादा वैभवची आणि निक्कीची नक्कल जान्हवी करणार आहे. अरबाज बेडरुममध्ये “हिला माझ्याजवळ येऊ देऊ नका मला त्रास होतोय” असं सगळ्या घरासमोर ओरडून सांगत होता. तो सीन हे तिघेही गार्डन परिसरात रिक्रिएट करणार आहेत. सूरज, वैभव आणि जान्हवीने अनुक्रमे अरबाज, वैभव आणि निक्की यांची नक्कल अगदी हुबेहूब केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून सूरजचं विशेष कौतुक केलं आहे. “सूरजचा अभिनय कमाल आहे”, “हे असं काहीतरी दाखवा मस्तच”, “खूप भारी dp दादा, सूरज”, “शोमध्ये निक्की-अरबाज एवढंच दिसतंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमो पाहून दिल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय”, धनंजयचं जॅकेट पाहून रितेशने घेतली फिरकी; म्हणाला, “बारामतीची स्टाईल…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi : …अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अरबाजची चांगलीच कानउघडणी केली आहे. आता यानंतर तो घरात कसा वागणार, टीम B ची सहाव्या आठवड्यात काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.