‘बिग बॉस’चा १६ वा सीझन संपला असला तरी या सीझनमधल्या स्पर्धकांची चर्चा मात्र सोशल मीडियावर अद्याप होताना दिसत आहे. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन या सीझनचा विजेता ठरला. बिग बॉस १६ च्या टॉप २ स्पर्धकांमध्ये एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोन स्पर्धक पोहोचले होते. मात्र शिव ठाकरेचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. अनेकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. सोशल मीडियावरही शिव ठाकरेला विजेतेपद न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली गेली.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद जिंकणारा शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’मध्येही पहिल्या दिवसापासून सक्रिय होता. मात्र त्याला या सीझनचं विजेतेपद जिंकता आलं नाही. तो या सीझनचा पहिला रनरअप ठरला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेने एका मुलाखतीत त्याचं खासगी आयुष्य, कुटुंब आणि पुढचे करिअर प्लान याविषयी भाष्य केलं. यावेळी त्याने सलमान खान आणि त्याच्या आई-बाबांच्या भेटीचा किस्साही सांगितला.

आणखी वाचा- ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

सलमान खानबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला, “जेव्हा सलमान खान माझ्या आई-बाबांना भेटाला आणि त्यांच्याशी मराठी भाषेत बोलला तो क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. माझ्या आई-बाबांना माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाचा अभिमान वाटतो. मी सलमान खानबरोबर एकाच मंचावर होतो यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी असू शकत नाही.”

आणखी वाचा- “मेरे बस में नहीं अब…” पाठकबाईंची राणादासाठी रोमँटीक पोस्ट, कमेंट करत हार्दिक जोशी म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिव ठाकरे लवकरच सलमान खानच्या चित्रपटात झळकणार आहे असं समोर आलं होतं. आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. यापैकी नक्की तो कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.