‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघं एक पाऊल दूर राहिला. त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. त्याच्या खेळापासून त्या मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडकरांचेही मन जिंकून घेतले. नुकतंच शिव ठाकरेने त्याच्या शर्टला असलेल्या किंमतीच्या टॅगवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

शिव ठाकरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. बिग बॉस संपल्यानंतर शिवने अनेक प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत शिव ठाकरेने विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शिवने लाल आणि काळ्या रंगाचा चेक्स पॅटर्नमधील शर्ट परिधान केला होता. त्याच्या या शर्टला असलेला किंमतीचा टॅग काढण्यास तो विसरला.
आणखी वाचा : “माझ्यासाठी तोच विजेता…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारताच मराठी अभिनेत्याचे थेट उत्तर

यावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. अनेकांनी या व्हिडीओवर शर्टाला असलेला किंमतीचा टॅग काढ, प्राईज टॅग काढ, अशा अनेक कमेंट केल्या. त्यावर आता शिवने उत्तर दिले आहे.

“तुम्ही कधी तुमच्या कपड्यांवरील किंमतीचा टॅग काढायला विसरला आहात का? तुमच्याबरोबरही असं कधी काही घडलं आहे का? असं होतं भावा, अनेकदा होतं”, असे शिवने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीत म्हटले आहे. त्याबरोबर त्याने ‘मुलांच्या गोष्टी’ असा हॅशटॅगही दिला आहे.

आणखी वाचा : “एमसी स्टॅनने माझी माफी मागितली कारण…” शिव ठाकरेचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.