बॉलीवूडमध्ये अनेक डान्स क्वीन आहेत; ज्यांनी आपल्या जबरदस्त डान्ससह अदांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यापैकी एक मलायका अरोरा आणि दुसरी नोरा फतेही. ‘छैय्या छैय्या’, ‘माही वे’, ‘होट रसीले’, ‘अनारकली डिस्को चली’, ‘मुन्नी बदनाम हुई’, अशी मलायकाची गाणी सुपरहिट ठरली आहेत. अजूनही मलायकाची ही गाणी ठिकठिकाणी वाजवली जातात. तसंच आता नोरा फतेहीची प्रत्येक गाणी सुपरहिट ठरताना दिसत आहेत. बॉलीवूडच्या याच डान्स क्वीनमध्ये नुकतीच जुगलबंदी पाहायला मिळाली. दोघींच्या या जुगलबंदीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

मलायका अरोरा आणि नोरा फतेही सध्या ‘बेस्ट डान्सर वर्सेज सुपर डान्सर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दोघी सतत रील व्हिडीओ करताना दिसतात. नुकतीच दोघींमध्ये डान्सची जुगलबंदी झाली. यात ४९ वर्षांची मलायका अरोरा नोरावर चांगली भारी पडली.

मलायका आणि नोराच्या डान्स जुगलबंदीचा व्हिडीओ ‘सोनी टीव्ही’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नोरा म्हणते, “चल आपण इंटरनेटवर आग लावून टाकू.” त्यानंतर दोघी जबरदस्त डान्स करतात. नोरा मलायकाचं गाणं ‘मुन्नी बदनाम हुई’वर डान्स करते. तर मलायका नोराचं ‘साकी साकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. वयाच्या ४९व्या वर्षांत मलायकाच्या डान्स स्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नेटकरी मलायका आणि नोराच्या डान्सचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, “खरंच हा इंटरनेटवर आग लावण्यासारखा डान्स होता.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मलायकाचा डान्स जबरदस्त होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी ‘बेस्ट डान्सर वर्सेज सुपर डान्सर’ या कार्यक्रमात नोरा फतेही आणि अमेरिकन गायक जेसन डेरुलोचा डान्स व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ‘स्नेक’ गाण्याच्या प्रमोशनसाठी जेसन उपस्थित राहिला होता. यावेळी दोघांनी मलायकाबरोबर डान्स केला होता. ‘स्नेक’ गाण्याची हुकस्टेप मलायका करताना दिसली होती. यावेळीही तिचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक करण्यात आलं होतं.