मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून भाऊ कदम प्रकाश झोतात आला.

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

भाऊने आता कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तसेच भाऊ अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. त्याची आईही गृहिणी होत्या. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं.

पाहा व्हिडीओ

वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर आली. तेव्हा त्यांना बीपीटीमधील घरसुद्धा सोडावं लागलं. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. बीपीटी चाळीमध्ये राहणाऱ्या भाऊ आता एका आलिशान घरामध्ये राहतात. त्यांच्या लेकीने घराचा एक व्हिडीओ तिच्या युट्युब चॅनलद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊच्या लेकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या घराचं आकर्षक इंटेरियर दिसत आहे. तसेच त्याच्या बेडरुमची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तसेच घरातील आलिशान हॉल विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. भाऊ सध्या राहत असलेलं घर खरंच लक्ष वेधून घेणारं आहे.