मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या विशाखाने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विशाखा तिच्या सोशल मीडियावरुन अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

नृत्याची आवड असलेल्या विशाखाने काही दिवसांपूर्वी ‘हुआ छोकरा जवां रे” गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. काळ्या रंगाची साडी नेसून या गाण्यावर ठुमके लावताना विशाखा दिसली होती. तिच्या चाहत्यांच्याही हा व्हिडीओ पसंतीस उतरला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनाही विशाखाचा हा डान्स व्हिडीओ आवडल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> Video: कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवल्याने दीपिका पदुकोणची राज कुंद्राशी तुलना; नेटकरी म्हणाले “बिकिनी घालून…”

विशाखाच्या या व्हिडीओवर गणेश आचार्य यांनी “सुपर गॉडब्लेस” अशी कमेंट केली आहे. गणेश आचार्यांनी केलेली कमेंट पाहून विशाखा सुभेदार भारावून गेली आहे. त्यांच्या कमेंटवर रिप्लाय करत “आईशप्पथ…सर…थँक्यू…आज तो दिन बन गया”, असं विशाखाने म्हटलं आहे. विशाखाने याचा स्क्रीनशॉट काढून त्याची पोस्टही शेअर केली आहे.

हेही वााचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

हेही वाचा>> आईच्या निधनानंतर राखी सावंतने किरण मानेंना केलेला फोन; अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला “ओक्साबोक्शी रडणाऱ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाखा सुभेदार सध्या स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.