‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख हे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘सुख कळले’ मालिकेत प्रेक्षकांना माधव-मिथिलाच्या सुखी संसाराची गोष्ट अनुभवता येणार आहे. माधव-मिथिला या दोघांचं सुख नेमकं कशात आहे हे सांगणारी गोड मालिका म्हणजे ‘सुख कळले!’ या नव्या मालिकेसाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

tula shikvin changalach dhada marathi serial saaniya chaudhari will enters in the show
अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला
thipkyanchi rangoli fame chetan wadnere and rujuta dharap wedding
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
thoda tujha thoda majha new marathi serial coming soon on star pravah Title song sung by Aarya Ambekar and Nachiket Lele
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच येतेय आणखी एक नवी मालिका, आर्या आंबेकर व नचिकेत लेले यांनी गायलं शीर्षकगीत
Tharala Tar Mag Fame amit bhanushali will entry Mi Honar Superstar Jodi Number 1 show
Video: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली झळकणार नव्या भूमिकेत! पाहा व्हिडीओ
Soham Bandekar will handle the production of Spruha Joshi new serial Sukh Kalale
स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ नव्या मालिकेत लाडक्या भावोजीचा लेक सोहम बांदेकर असणार महत्त्वाच्या भूमिकेत
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच

हेही वाचा : सलमानच्या घराबाहेर गोळीबार, वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना फक्त…”

‘सुख कळले’साठी ‘रमा माधव’ मालिकेची प्रक्षेपणाची वेळ बदलण्यात आली आहे. २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. नऊच्या स्लॉटला सध्या ‘रमा माधव’ मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळेच नव्या मालिकेसाठी वाहिनीने ‘रमा माधव’ मालिकेच्या प्रसारणात बदल केले आहेत.

हेही वाचा : Video : प्रार्थना बेहेरेला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

येत्या २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ २२ एप्रिलपासून रात्री ९ वाजता आणि ‘रमा राघव’ मालिका रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. अशी माहिती कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.