मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेडपदी नियुक्ती झाल्यावर अनेक नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या दोन मालिकांशिवाय ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा नवाकोरा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. याचबरोबर आता येत्या काळात आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा वाहिनीकडून करण्यात आली आहे. ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ अशा दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या मालिका सुरू झाल्यावर कलर्स मराठी वाहिनीवरच्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘अबीर गुलाल’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र” यावर आधारित या मालिकेचं कथानक असणार आहे. पहिल्या टीझरमध्ये केवळ दोन तान्ह्या बाळांची झलक पाहायला मिळाली होती. परंतु, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये मालिकेत कोणत्या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार याचा उलगडा झाला आहे.

हेही वाचा : Video: ‘सुख कळले’ मालिकेनंतर ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा; रश्मी अनपट, रेशम टिपणीससह झळकणार ‘हे’ कलाकार

‘तुला पाहते रे’ या मालिकेतून गायत्री दातार हा नवा चेहरा घराघरांत लोकप्रिय झाला. ही मालिका प्रचंड गाजली होती. आता अनेक वर्षांनी गायत्री पुन्हा एकदा मराठी कलाविश्वाच्या छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करायला सज्ज झाली आहे. ती साकारत असलेल्या पात्राचं नावं शुभ्रा असल्याचं प्रोमोमधून समोर आलं आहे. तर, गायत्रीच्या जोडीला या मालिकेत ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री पायल जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पहिल्याच प्रोमोमध्ये पायलचं पात्र काहीसं समजूतदार वाटत आहे. तर, गायत्री दातार प्रोमोमध्ये “शुभ्रा हेट्स ब्लॅक…” असं बोलताना दिसत आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या व अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याने मागितली माफी; म्हणाला, “माझी कमेंट व भाषा…”

हेही वाचा : पूजा सावंतने ऑस्ट्रेलियाच्या घरी नेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा! म्हणाली, “लग्नापूर्वी माझी ही इच्छा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या दोघींच्या “गुंतलेल्या नशिबाचा गुंतलेला खेळ” यांना कुठवर घेऊन जाणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अबीर गुलाल’ मालिका कोणत्या तारखेला व किती वाजता प्रसारित केला जाणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह काही मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, गात्रीच्या चाहत्यांनी तिला पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.