Colors Marathi New Serial Durga : ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे सध्या टीआरपीच्या बाबतीत ‘कलर्स मराठी’ला सुगीचे दिवस आले आहेत. २८ जुलैला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझनचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘बिग बॉस’ने सुरू होताच अगदी थोड्याच दिवसात रेकॉर्डब्रेक टीआरपी आणला आहे. अशातच आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

‘कलर्स मराठी’ ( Colors Marathi ) वाहिनीवरील नव्या मालिकेत आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा दाखवली जाणार आहे. या नव्या मालिकेचं नाव ‘दुर्गा’ असं आहे. मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रुमानी खरे आणि अंबर गणपुळे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “मालवणी भाषा माका कळता…”, म्हणत रितेश देशमुखने घेतला वैभवचा समाचार! रांगड्या गडीने हात जोडून मागितली माफी

कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेचा मुहूर्त ठरला!

अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी दुर्गा अभिषेक दादासाहेब मोहितेशी लग्न करते. ज्या घराने दुर्गाच्या कुटुंबाची वाताहत केली त्याच घरात दुर्गा माप ओलांडून प्रवेश करणार आहे. या घराचा रुबाब आणि दरारा जपणं ही तुमची जबाबदारी आहे असं दुर्गाची सासू तिला सांगते. तिच्या सासूची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी साकारली आहे. तर दादासाहेब मोहिते यांच्या भूमिकेत राजेंद्र शिसटकर झळकले आहेत.

आता ‘दुर्गा’ सासरचा रुबाब सांभाळणार की, वडिलांवर झालेल्या अनन्याचा प्रतिशोध घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही नवीन मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या २६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मालिका संध्याकाळी ७.३० वाजता ( Colors Marathi) प्रसारित केली जाईल. नेटकऱ्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “एक स्त्री असून वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य…”, निक्कीवर रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “सॉरी हृदयातून आलं पाहिजे”

colors marathi
दुर्गा नवीन मालिका ( फोटो सौजन्य : Colors Marathi )
View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘अंतरपाट’ ही मालिका ७.३० वाजता प्रसारित केली जाते. त्यामुळे नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘अंतरपाट’ मालिका बंद होणार की याची वेळ बदलणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. असंख्य नेटकऱ्यांनी “अंतरपाट आता किती वाजता लागणार?” असे प्रश्न कमेंट्समध्ये विचारले आहे.