Mohammed Siraj Mahira Sharma : ‘बिग बॉस 13’ फेम माहिरा शर्माचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. माहिरी ही पापाराझींच्या आवडत्या स्टार्सपैकी एक आहे. अनेकदा पापाराझी तिचे व्हिडीओ शेअर करत असतात. पारस छाबराबरोबर माहिराचं ब्रेकअप झाल्यानंतर तिचं नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत जोडलं जात आहे. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चा होत्या. या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. दोघांनाही या नात्याबद्दल विचारलं जात होतं. अखेर माहिरा शर्माने खरं काय ते सांगितलं आहे. तसेच सिराजनेही आयपीएल सुरू होण्यापूर्वी माहिराबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मा क्रिकेटर मोहम्मद सिराजला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. दोघेही नात्यात असून त्यांना नातं गुपित ठेवायचं आहे, असं बोललं जात होतं. मात्र, आता माहिराने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मोहम्मद सिराज यानेही त्याच्या लव्ह लाइफबद्दल होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
माहिरा शर्माची पोस्ट
माहिरा शर्माने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिलं, ‘अफवा पसरवणं बंद करा. मी कोणालाही डेट करत नाहीये.’ दुसरीकडे मोहम्मद सिराजने एक पोस्ट करत त्याच्या डेटिंगच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलं आहे.

मोहम्मद सिराजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती जी त्याने काही वेळाने डिलीट केली. त्यात लिहिलं होतं, “मी पापाराझींना विनंती करतो की त्यांनी माझ्याबद्दल प्रश्न विचारणं थांबवावं. या गोष्टी पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. मला आशा आहे की हे सगळं आता थांबेल.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत माहिरा शर्माने मोहम्मद सिराजला डेट करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली होती. “लोक माझं नाव वेगवेगळ्या लोकांबरोबर जोडतात. मी काम करत असेन तर अगदी माझ्या सहकलाकारांशी नाव जोडतात आणि व्हिडीओ एडिट करतात. खरं तर हे माझ्या नियंत्रणात नाही आणि मी या गोष्टींना फार महत्त्वही देत नाही. मी कोणालाही डेट करत नाहीये,” असंही माहिराने नमूद केलं होतं. कोणी तिच्याबद्दल चांगलं बोलत असेल वा वाईट ती त्यावर प्रतिक्रिया न देणं पसंत करते, असं माहिराने म्हटलं होतं.