Actor Nitin Chauhan Passed Away: टीव्ही इंडस्ट्रीतून एक खूप दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानचं निधन झालं. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री विभूती ठाकूरने तिचा मित्र नितीन चौहानच्या निधनाची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. विभूतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने नितीनसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. “Rest In Peace माय डिअर, मोठा धक्का बसलाय आणि वाईट वाटतंय” असं तिने कॅप्शन या फोटोला दिलं आहे. फोटोचं कॅप्शन बघता नितीन अडचणीत होता असं वाटतंय.

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

विभूती ठाकूरची पोस्ट

actor Nitin Chauhaan passed away
विभूती ठाकूरने केलेली पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘स्प्लिट्सविला’ सारख्या शोमध्ये काम करण्यासाठी नितीन ओळखला जायचा. तो ‘दादागिरी २’ या रिॲलिटी शोचा विजेता आहे. ‘क्राईम पेट्रोल’मधून ओळख मिळाल्यावर नितीन ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही झळकला होता. तो शेवटचा २०२२ मध्ये ‘तेरा यार हूं मैं’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.

हेही वाचा – “तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीनचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र नितीनने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. विभीती ठाकूरची पोस्टही त्याच प्रकारचे संकेत देत आहे. दरम्यान, नितीनचे वडील मुंबईत आले असून ते त्याचे पार्थिव अलिगढला घेऊन जाणार आहेत, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.