झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. या मालिकेतील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. या मालिकेत अजितकुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जाते. या मालिकेत विजय शिंदे ही भूमिका चांगलीच गाजली होती. विजय शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता एकनाथ गीतेने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

एकनाथ गीते हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याने त्याच्या चाहत्यांची आभार व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने फेसबुकवर लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल

एकनाथ गितेची फेसबुक पोस्ट

“काल सकाळी मी उठून माझा फोन बघितला तर ७८ miss calls होते. मी सर्वांना call back नाही करू शकलो Sorry.
१४० च्या आसपास insta stories add केल्या, नंतर काही stories add होत नव्हत्या, fail झाल्या त्यासाठी सॉरी,
काही Facebook posts miss झाल्या असतील माझ्याकडून, बऱ्याच जणांना WhatsApp, Messenger आणि Text वर रिप्लाय करू शकलो नाही, त्यासाठी सुद्धा Sorry.

मी खरंच माफी मागतो सर्वांची……..पण तुम्ही सर्वानी जे भरभरून, इतकं सारं प्रेम दिलं आणि माझा वाढदिवस “स्पेशल” बनवलात त्याबद्दल मी ऋणी राहिन सर्वांचा….. तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असु द्या… थँक यू आणि लव्ह यू”, असे एकनाथ गीतेने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आणखी वाचा : वीणा जगतापचा ‘कार’नामा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान एकनाथ गीतेने देवमाणूस या मालिकेतून विजय शिंदे याची भूमिका साकारली आहे. याच मालिकेतून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या मालिकेआधी त्याने ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा मालिकेतही काम केले आहे. विशेष म्हणजे त्याने ‘तांडव’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.