झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसतं. या मालिकेत अजितकुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जाते. या मालिकेत विजय शिंदे ही भूमिका चांगलीच गाजली होती. विजय शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता एकनाथ गीतेने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी खास पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ गीते हा अभिनेत्री त्रिशा कमलाकर हिला डेट करत आहे. या दोघांचे अफेअर २०१८ मध्ये सुरु झाले आहे. त्या दोघांच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतंच त्रिशाने तिचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

एकनाथ गीतेची पोस्ट

“तुझ्याबद्दल खूप लिहू शकतो मी न थांबता, न थकता. पण कदाचित ते पुरेसं नसेल, कारण तू जे केलंस, जे करतेस सतत माझ्यासाठी, ते शब्दांमध्ये मोजण्याइतकं छोटं नाहीये. तू “आरसा” आहेस माझ्यासाठी. माझ्यातला चांगला आणि वाईट माणूस एकत्र दाखवतेस आणि स्वीकारायला शिकवतेस. मी कधी कधी मान्य करत नाही, पण मला ते कळलेलं असतं.

लक फॅक्टर (Luck factor) वर विश्वास नव्हता माझा, पण तू आलीस आणि अचानक सगळं छान छान घडायला लागलं. तुझ्या येण्याने, तुझ्या असण्याने खूप सारे आणि खूप चांगले योगायोग घडत आहेत माझ्या आयुष्यात. आणि खरंतर थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी पण तरीही थँक्यू यू या सर्व गोष्टींसाठी Billudya. माझ्या अस्तित्वाची मलाच नव्याने ओळख करून देणाऱ्या माझ्या “आरशाला” वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छ्या. Billu I love you”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : अलिया-रणबीरच्या लेकीच्या नावाने वेधलं सिनेसृष्टीचे लक्ष, प्रियांका चोप्रासह सोनम कपूरची कमेंट चर्चेत

दरम्यान एकनाथ गीते यांनी देवमाणूस या मालिकेतून विजय शिंदे याची भूमिका साकारली आहे. याच मालिकेतून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या मालिकेआधी त्याने ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा मालिकेतही काम केले आहे. विशेष म्हणजे त्याने ‘तांडव’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame vijay shinde actor eknath gite girlfriend birthday post nrp
First published on: 25-11-2022 at 19:25 IST