अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही सध्या सातत्याने चर्चेत आहेत. आलियाने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अनेकांनी आलिया-रणबीरच्या पहिल्या बाळाचं स्वागत केले आहे. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. आलिया आणि रणबीरच्या लेकीचं नाव काय असणार याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर आलियाने तिच्या सोशल मीडियावर खास पोस्ट करत लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे तिने याचा अर्थही सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो नीट दिसत नाही. मात्र त्यांनी समोर असलेल्या भिंतीवर लाल व निळ्या रंगाच्या एका जर्सीवर तिचे नाव लिहिले आहे. या जर्सीवर ‘राहा’ असं लिहिण्यात आले आहे. आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव ‘राहा’ असे ठेवले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

आलियाने लेकीचे नाव जाहीर केल्यानतंर अभिनेता रणवीर सिंगने हार्ट इमोजी शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर सोनम कपूरनेही त्यावर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. आलियाची नणंद म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरनेही यावर कमेंट केली आहे. ‘राहा कपूर मी तुला कुशीत घेण्यास आतुर आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर अर्जुन कपूरनेही यावर कमेंट करत ‘राहा’ असे लिहून हार्ट इमोजी शेअर केले आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही यावर ‘राहा देवाचे तुझ्यावर सदैव आशीर्वाद राहू दे’ अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं, नीतू कपूर यांनी नातीचं नाव ठेवलं…

दरम्यान आलिया-रणबीरच्या लेकीच्या राहा नावाचा अर्थ फारच खास आहे. “राहा या नावाचा (तिच्या आजीने निवडलेलं नाव) खूप सुंदर अर्थ आहेत. राहाचा अर्थ होतो दैवी मार्ग. स्वाहिलीमध्ये आनंद. संस्कृतमध्ये कुळ, बांगलामध्ये विश्रांती, आराम व अरेबिकमध्ये आनंद, स्वातंत्र्य असा राहा या नावाचा अर्थ होतो.” असे आलियाने या पोस्टमध्ये म्हटले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra ranveer singh react to alia bhatt ranbir kapoor baby name nrp
First published on: 25-11-2022 at 17:35 IST