Devoleena Bhattacharjee Slams Pakistani User : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तान जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानमध्ये सीमेवर ड्रोन हल्ले करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तानचे हल्ले उधळून लावले आहेत. सेलिब्रिटी सोशल मीडियावर भारतीय लष्कराचं कौतुक करत आहेत.

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय लष्कराचं कौतुक करत आहेत. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने एक्सवर बऱ्याच पोस्ट केल्या आहेत. एका पाकिस्तानी युजरने देवोलीनावर टीका केली आणि तिला मुस्लीम पतीला सोडून दे असं सांगितलं. यानंतर देवोलीना चांगलीच भडकली आणि तिने या पाकिस्तानी युजरला सडेतोड उत्तर दिलं.

देवोलीनाला काय म्हणाला पाकिस्तानी युजर?

पाकिस्तानी एक्स युजरने देवोलीनाला म्हटलं, “मी सर्व भारतीय निर्मात्यांना विनंती करतो की कृपया देवोलीनाला काही काम द्या. ती घरी बसून वेडी झाली आहे. ती द्वेष पसरवत आहे. मला तिची चाहती असल्याचा पश्चात्ताप होतो. ती घाणेरडी, वाईट बोलणारी आणि मूर्ख आहे. जर तुम्हाला इस्लामचा इतकाच द्वेष असेल तर तुझ्या मुस्लीम नवऱ्याला सोडून दे.”

देवोलीनाने पाकिस्तानी युजरला दिलं उत्तर

पाकिस्तानी युजरने मुस्लीम पतीला सोडून दे, असं म्हणणाऱ्या युजरला देवोलीनाने सुनावलं. “हाहाहा… आता याला माझ्या कामाची काळजी वाटत आहे, ज्यांचा स्वतःचाच काही भरोसा नाही. जा आणि तुझा देश व टेरर कॅम्प सांभाळ. दोन दिवसांत तुमचं सैन्य भीक मागत आहे. माझ्या पतीची काळजी करण्यात तुझं रक्त जाळू नकोस. तुझ्या देशात ज्या दहशतवाद्यांना पोसलंय, त्यांना भारत सरकारच्या स्वाधीन करा… बिचारे मला त्रासले आहेत,” असं देवोलीनाने लिहिलं.

Devoleena Bhattacharjee Slams Pakistani User
देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट (फोटो – एक्स स्क्रीनशॉट)

देवोलीनाने केलंय आंतरधर्मीय लग्न

‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्जी सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. देवोलीनाने १४ डिसेंबर २०२२ रोजी शानवाज शेखशी लग्न केलं. शानवाज जिम ट्रेनर आहे. या दोघांना १८ डिसेंबर २०२४ रोजी मुलगा झाला. सध्या देवोलीना तिच्या बाळाबरोबर मातृत्वाचा आनंद घेतेय. ती तिच्या पती व मुलीबरोबरचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.