Bigg Boss Marathi 5 मध्ये काही सदस्यांची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले. धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे त्यापैकी एक आहेत. संपूर्ण सीझन ते एकमेकांबरोबर असल्याचे पाहायला मिळाले. ते एकमेकांना भाऊ-बहीण मानत असल्याचे दिसले होते. आता एका मुलाखतीत अंकिताच्या लग्नात आहेर काय देणार, यावर धनंजय पोवारने वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

धनंजय पोवारने नुकतीच ‘मीडिया टॉक मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुम्ही बिग बॉसमध्ये जाण्याआधी एक व्हिडीओ पाहिला होता. त्यामध्ये तुम्ही अंकिताला एक साडी भेट दिली होती. सध्या अंकिताच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तर, तुमच्याकडून बहिणीसाठी साडी देणार का? काय आहेर देणार, याचा विचार केला आहे का? यावर बोलताना धनंजय पोवारने मजेशीर उत्तर देत म्हटले, “आहेर काय द्यायचा, ती दिसते तशी नाही. जरा आगाऊ आहे. मला ती पाट मागेल, सोफा मागेल, साडी देऊन काय सात-आठ हजारांत भागवण्यासारखं मला वाटत नाही. पण भाऊ म्हणून लग्नात हजर राहणार आहे, तेव्हा ११०० रुपयांचं पाकीट वगैरे देईन”, असे त्याने हसत विनोदी पद्धतीने उत्तर दिले आहे. पुढे याबद्दल धनंजयने म्हटले, “बघू, भाऊ म्हणून जे काही करता येईल, ते चांगल्या पद्धतीने करू.”

बिग बॉसच्या घरात जाण्याआधीपासूनच अंकिताचा जोडीदार कोण आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर अंकिताने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच लग्न करणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. तिने हे जाहीर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: बाबा सिद्दीकींनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर बिग बॉस विजेता, सुरक्षा वाढवली; गेल्या महिन्यात उधळला हत्येचा कट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’नंतर यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्याबरोबरच ते अनेकविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या पर्वात कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सहभागी झाले होते. आता ते इतर कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.