‘ससुराल सिमर का’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका कक्कर नावारुपाला आली. हिंदी ‘बिग बॉस’मध्येही ती सहभागी झाली होती. आज छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ती एक आहे. अभिनेता शोएब इब्राहिमबरोबर तिने दुसरं लग्न केलं. नुकतंच शोएबला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारसोहळ्याला शोएबरोबर दीपिकाही गेली होती. यादरम्यानचाच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : “सहा ते सात हजार प्रेक्षक होते अन्…” प्राजक्ता माळीने भर कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सांगितला अनुभव

शोएबसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणं ही खूप मोठी व आनंदाची गोष्ट होती. या कार्यक्रमाला तो पत्नी दीपिकालाही घेऊन गेला होता. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच या ड्रेसवर हाय हिल्स तिने घातले होते.

दरम्यान कार्यक्रमामधून बाहेर पडतानाचा दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दीपिकाचा चालताना तोल गेला असल्याचं दिसत आहे. दीपिकाचा तोल गेलेला पाहता तिचाच एक चाहता तिला पडताना सांभाळण्यासाठी पुढे येतो. मात्र तिचा यावेळी राग अनावर होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं, नीतू कपूर यांनी नातीचं नाव ठेवलं…

“मी ठिक आहे. पण मला स्पर्श करू नको.” असं दीपिका त्या चाहत्याला बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण दीपिकाचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही. दीपिकाचं हे वागणं बरोबर नाही, तिला उगाचच मदत केली असं नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहता कमेंट केल्या आहेत.