छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात कोण-कोण स्पर्धेक म्हणून कलाकार मंडळी असणार याची चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच नाव निश्चित असून अजून एका स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. ‘खतरों के खिलाडी १२’मधील फैसल शेख ऊर्फ मिस्टर फैजू ‘बिग बॉस’ येत्या पर्वात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण यावर स्वतः आता फैसलनं मौन सोडून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा – “तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…

अलीकडेच फैसल इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. यावेळी फैसलला चाहत्यांनी विचारलं की, ” ‘बिग बॉस १७’मध्ये तू पाहायला मिळणार आहेस का?” यावर फैसल म्हणाला की, “तुम्ही मला या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात, याचाच मला खूप आनंद झाला आहे. मी एकेदिवशी या शोमध्ये नक्की जाईल. पण आता नाही.” याचाच अर्थ यंदाच्या पर्वात फैसल स्पर्धक म्हणून प्रवेश करणार नसल्याचं निश्चित झालं आहे. पण प्रिमियरला नेमकं सत्य काय आहे? हे उघडं होईल.

हेही वाचा – Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या फैजूनं ‘खतरों के खिलाडी १२’द्वारे टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तो या शोचा फर्स्ट रनर-अप होता. याशिवाय तो ‘झलक दिखला जा १०’मध्ये पाहायला मिळाला होता. या दोन्ही शोची ट्रॉफी फैजलनं जरी जिंकली नसली तरी प्रेक्षकांची मात्र मनं जिंकली आहेत.