scorecardresearch

…अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट

तेजस्विनी लोणारीला मिळाली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; पोस्ट शेअर करत म्हणाली…

…अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट
तेजस्विनी लोणारीची भावूक पोस्ट. (फोटो: तेजस्विनी लोणारी/ इन्स्टाग्राम)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात तेजस्विनी लोणारीला हाताला झालेल्या दुखापतीमुळे घरातून बाहेर पडावं लागलं होतं. तेजस्विनी ही ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक होती. खेळ अर्धवट सोडत घरातून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकही नाखूश होते.

तेजस्विनीला ‘बिग बॉस’च्या घरात परत घेण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत होती. तेजस्विनी व ‘बिग बॉस’च्या सोशल मीडियावरील पोस्टवर तशा कमेंटही प्रेक्षक करत होते. आता प्रेक्षकांनी त्यांच्या या लाडक्या स्पर्धकाला थेट ‘बिग बॉस’चा विजेताच घोषित केलं आहे. चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी ४’ ची ट्रॉफी तेजस्विनीच्या घरी पाठवली आहे. या टॉफ्रीवर ‘बिग बॉस मराठी ४ पब्लिक विनर’ असं लिहीलं आहे.

हेही वाचा>> Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

चाहत्यांकडून मिळणारे हे प्रेम पाहून तेजस्विनी भारावून गेली आहे. तिने फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. “माझ्यासाठी हाच विजय आहे. तुमचं निस्वार्थ प्रेम मी मिळवलं आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रेम दिलं आहे. मला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा पब्लिक विनर बनवल्याबद्दल तुमचे आभार मानते” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा>>लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

हेही वाचा>>सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

तेजस्विनी लोणारीला ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सी टास्कदरम्यान हाताला दुखापत झाली होती. चार ते सहा आठवडे आराम करण्याची व काळजी गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे तेजस्विनीला खेळ अर्धवट सोडत घरातून बाहेर पडावं लागलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 09:51 IST

संबंधित बातम्या