आज टीव्ही जगतात अनेक चॅनल्स प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. कधीकाळी डीडी हे एकमेव चॅनल अस्तित्वात होते मात्र आज असंख्य चॅनेल आहेत. मालिकांच्या गर्दीत प्रेक्षकांना माहिती देणारी चॅनेल्सदेखील आहेत. यात सोनी बीबीसीचा समावेश होतो. लवकरच त्यांच्या ‘फ्रोजन प्‍लॅनेट’चा दुसरा सीझन प्रदर्शनासाठी सज्‍ज आहे. ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’’चे वर्णन सर डेव्हिड अटेनबरो करणार आहेत. बहुप्रतिक्षित सहा भागांची मालिका ११ वर्षांच्‍या दीर्घकाळानंतर टीव्हीवर परतत आहे.

फ्रोजन प्‍लॅनेट २’ या मालिकेमध्ये प्रेक्षकांना जगातील सर्वात थंड भागात – उंच पर्वत, गोठलेले ओसाड प्रदेश, बर्फाच्छादित जंगले व बर्फाच्छादित महासागर या प्रदेशांमधील वन्यजीवांचे अन्वेषण यामध्ये दाखवण्यात आले आहे. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. ही मालिकादेखील अतिशय अत्याधुनिक कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा-हाय डेफिनिशनमध्ये चित्रित केली गेली आहे. पृथ्‍वीवरील गोठलेल्‍या प्रदेशांमधील अभूतपूर्व आश्‍चर्यांचा अनुभव घेण्‍याची संधी आपल्याला या मालिकेमधून बघायला मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कियारा अडवाणीने मराठीत मानले आभार; म्हणाली…

या मालिकेला तब्बल १० पुरस्कार मिळाले आहेत. प्राईमटाइम एम्‍मी पुरस्‍कार जिंकलेली पहिली मालिका आहे. या मालिकेच्या प्रिमीयरसाठी सोनी बीबीसी अर्थने एक स्पर्धा सुरु केली आहे. ही स्पर्धा ऑन-एअर आहे, यात विजेत्यांना प्रमुख शहरांमध्ये विशेष सेलिब्रिटी स्क्रीनिंगसाठी आमंत्रण मिळेल. तसेच भाग्यवान विजेत्यांना वेगवेगळी कुपन्स मिळणार आहेत.

सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍सचे प्रमुख विपणन अधिकारी तुषार शाह यांच्या मते ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’ ही यंदा सोनी बीबीसी अर्थवरील सर्वात मोठी मालमत्ता आहे. या शोच्‍या पहिल्‍या सीझनला प्रेक्षकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्‍याशी कटिबद्ध असून आम्‍ही चॅनेलवर असे आणखी एक्‍सक्‍लुसिव्‍ह व प्रीमियम कन्‍टेन्‍ट घेऊन येण्‍यास उत्‍सुक आहोत.’’ १७ ऑक्‍टोबर २०२२ रोजी मालिका प्रदर्शित होईल.