Bigg Boss 19: बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये सर्व क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार, लेखक, गायक, सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर, चित्रपटात काम केलेले कलाकार कुनिका सदानंद ही बॉलीवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री, असे विविध क्षेत्रातील व्यक्ती या पर्वात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे हा सीझन सर्वात मनोरंजक सीझनपैकी एक आहे, अशा कंमेट्स नेटकरी वेळोवेळी करताना दिसतात.
बिग बॉसच्या प्रोमोने वेधले लक्ष
आता बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव व बसीर यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बसीर गौरवला म्हणतो, “जीके सर तुम्ही शब्दांबरोबर चाकूसारखे खेळता.” गौरव म्हणतो, “तुला माझे बोलणे आवडले नाही. तुझ्या मनाला लागले. मी फक्त तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.” त्यावर बसीर म्हणतो, “तुम्ही थेट का बोलत नाही. बाकीच्या गोष्टी कशाला बोलता?” त्यावर गौरव म्हणतो, “इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलण्याची माझी सवय नाही.”
पुढे हा संवाद वादात बदलला. बसीर गौरवला म्हणाला, “तुमच्यामध्ये धाडस नाही”, त्यावर गौरव त्याला प्रत्युत्तर देत म्हणाला, “हा अजिबातच नाही.” बसीर पुन्हा गौरवला म्हणतो,”जिथे स्नायू दाखवायचे आहेत, तिथे स्नायू दाखवणार. जिथे ताकद दाखवायची आहे, तिथे ताकदच दाखवणार”, त्यावर गौरव म्हणाला, “हा आर्यनमॅनचा शो तर नाही. हा डोक्याने विचार करून खेळायचा शो आहे.” त्यानंतर बसीर असेही म्हणाला, “तुमचे हे रुप याआधी तर कधी पाहायला मिळाले नाही.”
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले. काहींनी गौरवची बाजू घेतली तर काहींनी बसीरची बाजू घेतली. एकाने लिहिले, “गौरवला भांडताना पाहण्यासाठी उत्सुक आहे”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “हेच होणे, अपेक्षित होते.”
गौरव खन्ना हा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. याआधी बसीरने गौरवला विचारले होते की तो कोणत्याच टास्कमध्ये ता सहभागी होत नाही? असाच प्रश्न अमाल मलिक आणि अभिषेक कुमार यांनीदेखील त्याला टास्कमध्ये सहभागी न होण्याचे कारण विचारले होते. त्यावर गौरवने त्याचा दृष्टीकोण सांगितला होता. तो म्हणालेला की हा शो ताकदीचा वापर करण्यापेक्षा मेंदूचा वापर करण्याचा आहे.
आता बिग बॉसच्या आगामी खेळात काय होणार, गौरवच्या व्यक्तीमत्वाची नवीन बाजू पाहून प्रेक्षक खुश होणार की नाही, कोण बरोबर असणार, कोण चूक असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.