‘अनुपमा’ ही छोट्या पड्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका त्यात येणाऱ्या ट्वीस्ट अॅण्ड टर्न्समुळे कायमच चर्चेत असते. तर काही दिवसांपूर्वीच या मालिकेने मोठा लीप घेतलेला पाहायला मिळालं होतं. यामुळे मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला होता. यामध्ये मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेला अभिनेता गौरव खन्ना म्हणजेच अनुज कपाडिया याची देखील मालिकेतून एक्झिट झाली होती. अशातच आता याबाबत नुकतच गौरवने भाष्य केलं आहे.

गौरव खन्नाने नुकतच एका मुलाखतीत ‘अनुपमा’ या मालिकेबद्दल भाष्य केलं आहे. गौरव मालिकेमध्ये अनुपमाच्या दुसऱ्या नवऱ्याच्या म्हणजेच अनुज कपाडियाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. तर त्याच्या या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. परंतू काही दिवसांपूर्वी मालिकेने घेतलेल्या मोठ्या लीपमुळे मालिकेच्या कथानकात काही बद्दल झाले आणि अनुज कपाडियाची मालिकेतून एक्झिट झाली. अशातच आता नुकतच गौरवने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.

गौरवने पिंकव्हिलाशी संवाद साधताना म्हटलं आहे, की “‘अनुपमा’ या मालिकेत अनुज हे पात्र साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं. मालिकेतील माझे सहकलाकार यांच्याबरोबर काम करतानाचा माझा अनुभव खूप चांगला आहे. मालिकेचे निर्माते राजन सहानी यांच्याकडून खूप काही शिकता आलं. राजन सरांनी मला जेव्हा या पात्राबद्दल फोनवर सांगितलं तेव्हा ते एकून या मालिकेसाठी मी लगेच हो म्हटलं. आणि अनुज कपाडिया हे पात्र माझ्या खूप जवळचं आहे. पण प्रत्येक पात्राचं एक वेगळेपण असतं, एक प्रवास असतो आणि माझ्या पात्राचाही होता. पण आता जे कथानक आहे ते वेगळं आहे. त्यामुळे मला माहित नाही हि मालिका आहे इथे काहीही होऊ शकतं. कदाचित माझी पुन्हा मालिकेत एन्ट्रीही होऊ शकते”.

दरम्यान, गौरव खन्नाने नुकतच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमाचं विजेतेपद पटावकलं आहे. या कार्यक्रमामुळे गौरव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कार्यक्रमामध्ये गौरव वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसला. तर या शोबद्दल बोलतानाही तो म्हणाला की, “सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोचं विजेतेपद जिंकल्यानंतर ‘अनुपमा’मधील कलाकारांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या”. ‘अनुपमा’ व ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या दोन्ही शोमधून त्याच्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंक्लयानंतर आता गौरव कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटील येणार हे पाहणं रंजक ठरेल.