‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदवीर नावारुपाला आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. या कार्यक्रमामुळे त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन अशी एक वेगळी ओळख मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव विविध पात्र साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या अभिनयाचे तर आता लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरवचा सतत अपमान होतो याबाबत त्याने स्वतः भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही स्किट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. काही स्किटमध्ये गौरवचा बराच अपमान केला जातो. गौरववर करण्यात आलेले विनोद प्रेक्षकांनाही आवडतात. शिवाय तो स्वतःचा अपमान दिलखुलासपणे स्वीकारतो. तसेच प्रत्येक स्किट एण्जॉय करतो.

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीची हिंदी मालिकेमध्ये एंट्री, प्रोमो पाहून प्रार्थना बेहरेची कमेंट, म्हणाली, “बेबी…”

पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये करण्यात येणाऱ्या अपमानाबाबत गौरवला कसं वाटतं? याबाबत त्याने स्वतः भाष्य केलं आहे. ‘बीबीसी न्यूज मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरवला याबाबत विचारण्यात आलं. यावेळी माझा अपमान मी एण्जॉय करत असल्याचं त्याने सांगितलं. “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये तुझा सतत अपमान होतो. तर सतत होणाऱ्या अपमानाबाबत तुला काय वाटतं?” असा प्रश्न गौरवला विचारण्यात आला.

आणखी वाचा – लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; अभिनेत्रीचा बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाली, “मला…”

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर तो म्हणतो, “खरं सांगू का मी हे सगळं एण्जॉय करतो. कधी कधी एखाद्या स्किटमध्ये माझा अपमान कमी झाला, अजून एखादा विनोद माझ्यावर हवा असं मी स्वतःहून सांगतो. वनिता व मी बऱ्याचदा एकत्र स्किट करतो. खरात काकुंच्या स्किटवेळी मी स्वतः तिला सांगतो की, मी तुझ्या जवळ आल्यानंतर तू मला जोरात मार. वनितालाही ते करतााना मजा वाटते”.