अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्न, हळदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये गौतमी-स्वानंदचा लग्नसोहळा एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडला असल्याचं पाहायला मिळत आहे. हे रिसॉर्ट नेमकं कुठे आहे? याचं भाडं किती याबाबत जाणून घेऊयात…

गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोन दिवसांपूर्वी दोघांनीही इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. दोघांचा शाही विवाहसोहळा पुण्यातील वाइल्डर्नेस्ट हिलटॉप रिसॉर्टमध्ये पार पडला आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video: अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? समोर आला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

गौतमी-स्वानंदच्या जवळच्या काही मित्र-मैत्रिणींनी लग्नाच्या फोटोंना लोकेशन वाइल्डनेस्ट हिलटॉप रिसॉर्ट असं दिलं आहे. हे रिसॉर्ट पुण्यात सिंहगड रोडवर आहे. या रिसॉर्टमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असा ९ तास वेळ घालवण्यासाठी प्रत्येकी १ हजार ३०० ते दीड हजार रुपये मोजावे लागतात. तसेच या रिसॉर्टचं एका रात्रीचं संपूर्ण पॅकेज जवळपास ४ ते ६ हजार आहे. अशी माहिती रिसॉर्टच्या अधिकृत साइटवर देण्यात आली आहे.

हेही वाचा : सविता मालपेकर यांना एका लोकप्रिय मालिकेदरम्यान दिला होता चॅनेल हेडने त्रास, प्रसंग सांगत म्हणाल्या, “अंतर्वस्त्र…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गौतमी देशपांडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरील मालिका ‘माझा होशील ना’मुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय सध्या गौतमी ‘गालिब’ या नाटकांत प्रमुख भूमिका साकारत आहे. तसेच स्वानंदच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तो ‘भाडिपा’चा व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहत आहे.