‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवणारी अन् ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली गौतमी देशपांडे नेहमी चर्चेत असते. सध्या तिचं रंगभूमीवर ‘गालिब’ हे नाटक जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तिला या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अशा लोकप्रिय गौतमीने नुकतीच पती स्वानंद तेंडुलकरबरोबर भायखळाच्या राणीच्या बागेची सफर केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरचा राणीच्या बागेतला व्हिडीओ ‘द मुंबई झू’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघं संपूर्ण राणीच्या बागेची सफर करताना दिसत आहेत. तसेच तिथल्या विविध वनस्पतींविषयी जाणून घेताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Oscars 2024: ऑस्करच्या रेड कार्पेटवर पडली प्रसिद्ध अभिनेत्री, विनोद करत म्हणाली, “मी माझा विमा…”

गौतमी व स्वानंदचं लग्न झाल्यापासून दोघं बरेच विनोदी व्हिडीओ करताना दिसत आहेत. तसंच अभिनेत्री आपल्या सुरेल आवाजात अनेक गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामुळे लग्न झाल्यापासून दोघंही चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, २३ डिसेंबरला मेहंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट करून गौतमी-स्वानंदने प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला. या लग्नाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर गौतमी-स्वानंद कोकणात फिरायला गेले होते.

हेह वाचा – “…त्यामुळे मी माझ्या मुलाला इंडस्ट्रीच्या सावलीला देखील आणलं नाही”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक लेकाविषयी सांगत म्हणाल्या…

गौतमीचा पती कोण आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमीचा पती स्वानंद तेंडुलकर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहे. ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. शिवाय त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.