‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिने कलाविश्वात पदार्पण केलं. देशपांडे बहिणींच्या जोडीची सिनेसृष्टीत नेहमीच चर्चा असते. नुकताच गौतमीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्रीने क्रिएटर स्वानंद तेंडुलकरशी २५ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नातील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या गौतमीने शेअर केलेल्या एका नव्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गौतमी देशपांडे अलीकडेच तिच्या जुन्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना भेटायला गेली होती. अभिनेत्रीने तिच्या जुन्या ऑफिसमधील काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्याने गौतमी जवळपास ४ वर्षे एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला होती.

हेही वाचा : Video : “मराठी चित्रपटसृष्टीत एकजूट नाही!” पुष्कर जोगची खंत; ‘मुसाफिरा’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जुनं ऑफिस, ऑफिसमधील डेस्क, तिची संपूर्ण टीम याची खास झलक दाखवली आहे. यातील एका फोटोमध्ये अभिनेत्रीने तिचा डेस्क दाखवला आहे.

या फोटोला तिने “पाच वर्षांपूर्वी हा माझा डेस्क होता” असं कॅप्शन दिलं आहे. सगळ्या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या जुन्या ऑफिसच्या सहकाऱ्यांबरोबर एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

gautami
गौतमी देशपांडे

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं पहिलं घर! म्हणाला, “लहानपणापासून आम्ही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौतमी देशपांडेने ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर ‘गालिब’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.