सध्या टीआरपीच्या गणितावरून एखाद्या मालिकेची कालमर्यादा ठरवली जात आहे. जर मालिकेला टीआरपी चांगला असेल तर ती मालिका बरेच वर्ष सुरू ठेवली जाते. पण जर टीआरपी कमी असेल तर ती मालिका अचानक बंद केली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षही पूर्ण न होता पाच किंवा सहा महिन्यांत मालिका अचानक ऑफ एअर झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे सध्या मालिकेला चांगला टीआरपी असणं अत्यंत महत्त्वाच झालं आहे. अशातच मागील आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये नवीन मालिका कोणत्या स्थानावर आहेत? जाणून घ्या…
१८ मार्चपासून चार नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन नवीन मालिका सुरू झाल्या. तर प्रतिस्पर्धक असलेल्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ व ‘नवरी मिळे हिटलरला’ हा दोन नवीन मालिका सुरू झाल्या. या चारही मालिकांची दमदार सुरुवात झाली, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणत्या नवीन मालिकेला अधिक होता? हे टीआरपी रिपोर्टमधून समोर आलं आहे.
हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती-शुभम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस! निमित्त आहे खास
‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन्ही नवीन मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये टॉप-१०मध्ये आहेत. रेश्मा शिंदे व सुमीत पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका पाचव्या स्थानावर असून ६.४ रेटिंग मिळाले आहे. तर शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची ‘साधी माणसं’ मालिका आठव्या स्थानावर आहे. या मालिकेला ४.८ रेटिंग मिळाले आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
तसेच ‘झी मराठी’वर १८ मार्चपासून सुरू झालेल्या ‘पुन्हा कर्तव्य आहे’ व ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका टॉप-३०मध्ये आहेत. अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ २५व्या स्थानावर असून २.३ रेटिंग मिळाले आहे. तसेच राकेश बापट, वल्लरी विराज यांच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका २६व्या स्थानावर आहे. या मालिकेला २.२ रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, टीआरपीच्या रिपोर्टमध्ये टॉप-२मध्ये ‘ठरलं तर मग’ व ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अढळ स्थान निर्माण केलं आहे.
हेही वाचा – Video: एसएस राजामौली यांचा पत्नीसह एआर रेहमान यांच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
मागील आठवड्याच्या टेलीव्हिजनवरील टॉप-१० मालिका
१) ठरलं तर मग
२) प्रेमाची गोष्ट
३) स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४
४) लक्ष्मीच्या पाऊलांनी
५) घरोघरी मातीच्या चुली
६) तुझेच मी गीत गात आहे
७) सुख म्हणजे नक्की काय असतं
८) साधी माणसं
९) मन धागा धागा जोडते नवा
१०) अबोली