‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘लगोरी’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. म्हणजेच रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता रेश्मा शिंदेच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसंच तिचा होणारा नवरा कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांनी लागली आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने स्वतःच्या केळवणाचे फोटो शेअर करण्याआधी अभिनेता सुयश टिळकने फोटो शेअर केले होते. सुयशने रेश्माला शुभेच्छा देत केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण काही वेळानंतर सुयशने ती पोस्ट डिलीट केली. मात्र, रेश्माच्या केळवणाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिने स्वतः केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

“जीवनात ही घडी अशीच राहू दे”, असं कॅप्शन लिहित रेश्माने केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. केळवणासाठी अभिनेत्रीने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर तिने हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस घातला होता. तिच्या केळवणासाठी खास फुलांची सजावट, पंचपक्वान्न करण्यात आलं होतं. भजी, आलू वडी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, कारळ्याचे काप, कोशिंबीर, पोळी, भात, तूप, शेवयाची खीर, गुलाब जामुन, रस-मलाई, जिलेबी, आइस्क्रीम असे गोड-धोडचे पदार्थ रेश्माच्या केळवणासाठी खास करण्यात आले होते.

तसंच रेश्माला आहेर म्हणून हिरव्या बांगड्या, साडी, गजरा अशा सौभाग्याच्या वस्तू देण्यात आल्या. यावेळी केक वगैरे कापूनही सेलिब्रेशन करण्यात आलं. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांसह सुयश टिळक, ऋतुजा बागवे, मृणाल देशपांडे यांनीदेखील रेश्माच्या केळवणाला खास उपस्थिती लावली होती.

हेही वाचा – “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा – “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांचा सुखद धक्का बसला आहे. तिच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच “नवरा कोण आहे?”, असं चाहत्यांकडून विचारलं जात आहे. रेश्माचा होणारा जोडीदार पाहण्याची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.