‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे सध्या हृषिकेशच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये सुमीत काम करत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली हृषिकेशची भूमिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली आहे. तसंच सुमीतच्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील सुमीतसह अभिनेत्री रेश्मा शिंदे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे पाहायला मिळत आहे. नुकतीच सुमीतने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुमीत पुसावळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी बायकोबरोबरचे सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील कलाकारांबरोबरचे त्याचे मजेशीर व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सुमीतने बायको मोनिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Revanth Reddy on Allu Arjun arrest: “अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध लढत नाहीये, पैसे कमवतोय”, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फायर मोडमध्ये; अटकेचं केलं समर्थन

मोनिकाबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत सुमीत पुसावळेने लिहिलं की, दोन वर्ष झाली आज बायको, जिच्यामुळे माझं आयुष्य सुंदर बनलं, जी गेली दोन वर्ष माझी सावली होऊन मला माझ्या सुख दुःखात साथ देतेय, स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतेय , माझ्या प्रत्येक छोट्या -मोठ्या आवडी निवडी लक्षात ठेवणारी माझी बायको, माझ्यावर कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझ्यावरच प्रेम तसुभरही कमी नाही होतं तुझं. तू बरोबर असलीस की आयुष्य खूप छान वाटतं.

तसंच पुढे सुमीतने लिहिलं, “आजच्या या खास दिवशी मी देवाला प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यातल्या या खास व्यक्तीला नेहमी सुखात ठेव, हाच जन्म नाही तर जन्मोजन्मी आपलं नातं असंच राहावं, आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.”

हेही वाचा – 100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव का होता? ‘आवारा’चा गाजलेला किस्सा काय?

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका होणार Off Air! ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य, अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमीत पुसावळेच्या या खास पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच मोनिकानेही प्रतिक्रियेद्वारे आभार मानले आहेत. “थँक्यू सो मच अहो, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, लव्ह यू”, असं मोनिकाने लिहिलं आहे.