scorecardresearch

विकी कौशलने पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात लावली हजेरी; फोटो व्हायरल

हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे

विकी कौशलने पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात लावली हजेरी; फोटो व्हायरल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठीतला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा गेली अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांचे प्रमोशन केले जातेच तसेच या कार्यक्रमात विनोदी स्किट्समुळे हा कार्यक्रम खास करून बघितला जातो. भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके या कलाकारांमुळे कार्यक्रमाला रंगत येते. या कार्यक्रमाची हवा इतकी आहे की आता बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमात आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येत आहेत.

नुकताच या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आला होता. त्याच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमबरोबर आला होता. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. त्यातील अमेय वाघ याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाच्या टीम बरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा

अमेय वाघ नुकताच मी वसंतराव’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो विकी कौशलच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.चित्रपटाच्या पोस्टरवरून तरी तो एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमी पेडणेकरने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर कियारा अडवाणी त्याची प्रेयसी दाखवली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, हृषीकेश कुलकर्णी असे मात्तबर कलाकार आहेत.

हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:06 IST

संबंधित बातम्या