Samruddhi Kelkar Shared A Video : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अलीकडेच या मालिकेत कृष्णा व दुष्यंत यांचा लग्नसोहळा पार पडल्याचंं पाहायला मिळालं. अशातच आता मालिकेत या दोघांच्या लग्नानंतरचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

समृद्धी केळकर अनेकदा मालिकेच्या सेटवरील फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कष्णा-दुष्यंत यांच्या लग्नानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडताना दिसतोय. ज्यामध्ये सृमृद्धी व अभिषेक रहाळकर पारंपरिक पद्धतीने तयार झाले असून सीन करताना दिसत आहेत.

‘हळद रुसली कुंकू हसलं’मध्ये पार पडणार जागरण गोंधळाचा कार्यक्रम

सृमृद्धी केळकरने इन्स्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील जागरण व गोंधळाचा हा कार्यक्रम पार पडत असतानाचा व्हिडीओ शेअर करीत त्याला ‘मंडळी, कृष्णा-दुष्यंतच्या लग्नाचा जागरण गोंधळ हाय, अवतान धाडलंय नक्की यायचं’ अशी कॅप्शन दिली आहे.

कृष्णा-दुष्यंत यांच्या लग्नानंतर मालिकेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामुळे सेटवर पारंपरिक पद्धतीची सजावट करण्यात आल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. त्यासाठी सर्व कलाकार एकत्र जमलेले पाहायला मिळतात. तर कृष्णा व दुष्यंतसुद्धा जागरण, गोंधळानिमित्त धमाल करीत ते सीन शूट करताना दिसत आहेत. जागरण, गोंधळाचा हा भाग प्रेक्षकांना आज ४ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. अवघ्या कमी काळात मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. समृद्धी व अभिषेक यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र काम करीत असून त्यांची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

समृद्धी व अभिषेकबरोबर या मालिकेतून इतरही अनेक लोकप्रिय कलाकार मंडळी पाहायला मिळतात. यापूर्वी अभिषेक याच वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’मधून झळकलेला, तर समृद्धीसुद्धा ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून पाहायला मिळालेली. त्यामुळे दोघेही मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून, आता या मालिकेतील त्यांची केमिस्ट्रीसुद्धा हळूहळू उलगडताना पाहायला मिळतेय.

मालिकेत कृष्णा-दुष्यंत यांच्या लग्नानंतर आता या दोघांचं नातं कसं पुढे जाणार. गावाकडील कृष्णा दुष्यंतच्या घरात स्वत:ला कशी सांभाळून घेणार? यादरम्यान तिला दुष्यंतची साथ कशी लाभेल हे पाहणं रंजक ठरेल.