हार्दिक जोशी व अक्षया देवधर त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघांनीही नाशिकला जात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हार्दिकच्या घरीही अक्षयाचं जोरदार स्वागत झालं. दोघंही सध्या सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. आता हार्दिकने एक खंत व्यक्त केली.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाई हनिमूनला कुठे जाणार? हार्दिकने स्वतःच दिलं उत्तर, म्हणाला, “अजूनही आम्ही…”

हार्दिक त्याच्या कामाला अधिकाधिक प्राधान्य देतो. लग्नाची तयारीही अक्षयाने एकटीने केली असल्याचं हार्दिकने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. आताही तो त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे. अक्षयाला फिरायला घेऊन जाण्यासाठी तो सध्या प्लॅन करत आहे.

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिकने म्हटलं की, “मी तिला का फिरायला घेऊन जात नाही? अशी मला एक खंत राहिली आहे. मी माझ्या कामामधून वेळ काढत तिला घेऊन जाणार आहे. मी काम करत होतो आणि अक्षया एकटी सगळं लग्नाचं काम सांभाळत होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – “आयुष्य बदललं कारण…” लग्नानंतर राणादा कसं जीवन जगतो? घरातून बाहेर पडताना बायकोला व्हिडीओ कॉल केला अन्…

“त्यामुळे लवकरच तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. मी तिला घेऊन जाण्यापेक्षा मीच तिला विचारेन की तुला कुठे फिरायला जायचं आहे. जिथे कुठे जाण्याचं तिचं स्वप्न असेल तिथे मी तिला घेऊन जाईन.” आता हार्दिक व अक्षया कुठे फिरायला जाणार हे काही दिवसांमध्ये त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे स्पष्ट होईलच.