गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे. मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा हर्षदा खानविलकर व संग्राम समेळ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘मुलगी पसंत आहे!’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. हर्षदा खानविलकर, संग्राम समेळसह एक नवा चेहरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कल्याणी टिभे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘सन मराठी’वरील ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये होणाऱ्या सूनेची ओळख दाखवण्यात आली आहे. तसंच एक ट्विस्टही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या वादावर सौरभ गोखले स्पष्टच बोलला, म्हणाला, “हे दुर्दैवी आहे….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिकेतील कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या हर्षदा खानविलकर या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसंच काही महिन्यांपूर्वी संग्राम समेळची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका टीआरपीच्या कारणास्तव बंद करण्यात आली. हर्षदा खानविलकर व संग्राम समेळ ‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र झळकले होते. या नव्या मालिकेमधील प्रमुख भूमिकेतील आराध्या म्हणजे कल्याणी टिभेने यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. आता ‘मुलगी पसंत आहे!’ नवी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? हे येत्या काळात समजेल.