Bigg Boss 19 Show : टीव्हीवरील वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. मराठीसह हिंदीमधील ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाची चर्चा होत असते. अशातच आता लवकरच हिंदी बिग बॉस सुरू होणार आहे. काही दिवसांपुर्वीच बिग बॉसच्या आगामी १९ व्या पर्वाची घोषणा झाली.
सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोच्या प्रत्येक पर्वाची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. ‘बिग बॉसच्या आगामी १९ व्या पर्वाचीसुद्धा अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच अनेकांचं लक्ष या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडे तसंच शोची थीम काय असणार? याकडे लागून राहिलं आहे.
‘बिग बॉस १९’चा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सलमान खान एका नेत्याच्या भूमिकेत दिसतोय. त्यामुळे या सीझनची थीम राजकारणाशी संबंधित असणार अशी चर्चा होताना दिसत आहे. अशातच या पर्वात सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांची संभाव्य नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि एल्विश यादव हे दोघं या नव्या सीझनमध्ये सहभागी होणार आहेत अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. अर्थात अद्याप याबद्दल दोघांपैकी कोणीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तरी दोघांचे चाहते त्यांना ‘बिग बॉस १९’मध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. या दोघांशिवाय इतर स्पर्धकांची संभाव्य यादीसुद्धा समोर आली आहे.
‘बिग बॉस १९’ – संभाव्य स्पर्धकांची यादी
गुरुचरण सिंग – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सोढी
शैलेश लोढा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे लेखक
अपूर्वा मुखिजा – डिजिटल क्रिएटर
रफ्तार – गायक आणि रॅपर
मीरा देवस्थळे – मराठी व हिंदी मालिकांतील अभिनेत्री
धनश्री वर्मा – कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया स्टार
अमाल मल्लिक – गायक आणि संगीतकार
गौरव खन्ना – लोकप्रिय अभिनेता
दरम्यान, ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन येत्या २४ ऑगस्टपासून रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस १९’ हा शो प्रेक्षकांना ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर पाहायला मिळेल.