कॉमेडियन कपिल शर्माचा शो बऱ्याचदा कलाकार सोडून जातात म्हणून चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच कृष्णा अभिषेकने शो सोडला होता, पण नंतर मात्र तो परत आला. निर्मात्यांशी पैशांवरून झालेल्या वादामुळे शो सोडल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याला त्याची फी वाढवून दिल्यानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतला. पण, कृष्णा अभिषेक एका एपिसोडचे नक्की किती रुपये घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का, चला तर जाणून घेऊयात.

बदकासारख्या चालीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मलायका अरोराचं स्पष्ट उत्तर; नितंबांचा उल्लेख करत म्हणाली…

‘सियासत’च्या रिपोर्टनुसार, कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी १० ते १२ लाख रुपये चार्ज करतो. त्याच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्याने पैशांमुळे परत येत नसल्याचे सांगितले होते. रिपोर्ट्सनुसार, कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी १० लाखांपेक्षा जास्त फी घेतो. कृष्णा देशातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे. काही दिवस कपिल शर्माच्या शोमध्ये न दिसणारा कृष्णा आता सपना बनून परतला आहे.

कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रेक्षकांची आवडती सपना उर्फ ​​कृष्णा अभिषेक प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतला आहे. याचे अनेक प्रोमो सध्या चर्चेत आहेत आणि चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याने शो सोडल्यानंतर त्याला परत आणण्याची मागणी बऱ्याचदा केली गेली होती.