चित्रपट, मालिका व वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनाबद्दल चाहत्यांना कायम कुतूहल असतं. या कलाकारांना कामाचा मोबदला किती मिळतो, याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं असतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप गेली अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. एका मुलाखतीत त्याला किती मानधन मिळतं व ती रक्कम तो कशी खर्च करतो, याबद्दल विचारण्यात आलं.

हेही वाचा – आडनाव का लावत नाहीस? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितली दोन कारणं; म्हणाला, “आडनाव पाहून…”

‘टीव्ही कलाकारांना किती मानधन मिळतं’, ‘तुला मिळणाऱ्या पैशांचं व्यवस्थापन कसं करतोस’? असा प्रश्न पृथ्वीकला विचारण्यात आला. उत्तर देत पृथ्वीक म्हणाला, “कलाकारांना एक विशिष्ट रक्कम मिळत नाही. प्रत्येकाचं मानधन वेगळं असतं. महिन्याला व्यक्तीपरत्वे हा आकडा २० हजार ते २ लाख असा असतो, कधी कधी तो ५ लाखांवरही जातो. एखाद्याला पाच लाख मिळतात, हे पाहून आपल्यालाही तितकीच रक्कम मिळेल, असं आपल्याला वाटतं. पण, त्या व्यक्तीने महिन्याला २० हजार रुपयांपासून सुरुवात केलेली असते.”

इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मानधनाचे टप्पे सांगत पृथ्वीक म्हणाला, “काहींना महिन्याला १५-१८ हजार मिळतात. ज्युनिअर आर्टिस्टना दिवसाला फक्त ८०० रुपये मिळतात, ते १० दिवसच काम करतात म्हणजे त्यांना फक्त ८ हजार रुपये मिळतात. सुरुवातीला एखाद्या मालिकेत १५००-२ हजार रुपये पर डे म्हटलं की कलाकार खुश होतात, त्यांना वाटतं की आपले महिन्याचे ६० हजार होतील, पण तसं नसतं. कारण त्यांचे सीन कमी असतात परिणामी महिन्यात मोजकेच दिवस काम मिळतं. लोकप्रिय झाल्यावर मानधनात वाढ होते.”

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला महिन्याला ६० हजार रुपये मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, १० हजार रुपये एसआयपी, १० हजार रुपये इन्शुरन्स यात ४० हजार जातात. उरलेल्या पैशांत मी माझं आयुष्य जगतो. उरलेल्या २० हजार रुपयात मेडिकल, भाजीचा खर्च सगळं निघतं. बाकी गोष्टीत मला दादा-वहिनीची मदत होते,” असं पृथ्वीक प्रताप म्हणाला. आपण उरलेले पैसे आपल्या आनंदासाठी खर्च करायला पाहिजे, असा सल्लाही त्याने दिला.