सुरुची अडारकरने ६ डिसेंबर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्नाची बातमी दिले. तिने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नबंधनात अडकल्याचं जाहीर केलं. लग्नानंतर सुरुची छोट्या पडद्यावर परतली आहे. सुरुची अडारकरने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून कमबॅक केले आहे. तिचा या मालिकेतील ग्लॅमरस लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नागिनच्या भूमिकेबद्दल सुरूची म्हणाली…

नागिनच्या भूमिकेबद्दल बोलताना सुरुची म्हणाली, “माझा लूक मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. मी अशी भूमिका कधीच साकारली नाही. मी या शोमध्ये नागिनची भूमिका करणार आहे हे कळाल्यावर मी खूप उत्साहित होते. या पात्रात खूप वेगळेपण आहे.” यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.

‘का रे दुरावा’नंतर सुरुची अडारकरचं तब्बल ८ वर्षांनी ‘झी मराठी’वर पुनरागमन! ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारणार भूमिका

सुरूचीच्या भूमिकेबद्दल पियुष रानडेची प्रतिक्रिया

पती पियुष रानडेने शोचा प्रोमो पाहून कशी प्रतिक्रिया दिली याबद्दल सुरूची म्हणाली, “पियुषला प्रोमो आवडला. खरं तर मी आणि पियूष आमच्या कामाबद्दल फारशी चर्चा करत नाही. पण त्याने माझा प्रोमो पाहिला आणि त्याला तो आवडला. मी माझ्या करिअरमध्ये अशी अनोखी भूमिका स्वीकारली हे त्याला आवडलं.”

डॉ. नेनेंनी सांगितलं माधुरी दीक्षितसह अमेरिका सोडून मुंबईत परतण्याचं कारण, ‘अशी’ होती त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

पियुष माझा आधार आहे- सुरूची

लग्नानंतर आयुष्यात या बदल झाले, याबद्दल सुरुची म्हणाली, “लग्नानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी मी माझे शूट संपवून घरी पोहोचायचे आणि आई सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. आता ती जबाबदारी मला पार पाडावी लागते. माझा नवरा पियुष माझा खूप मोठा आधार आहे आणि आम्ही घरातील कामं वाटून घेतो. मी घरातील सामान आणते आणि इतर कामं बघते.”

View this post on Instagram

A post shared by ??????? N ??????? (@suruchiadarkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नानंतर लगेच ही मालिका मिळाली, त्याबद्दल सुरुची म्हणाली, “मी सध्या माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हा आयुष्यातील सर्वात चांगल्या टप्प्यांपैकी एक आहे. मला हा प्रकल्प लगेच मिळाला आणि मी हा आशीर्वाद मानते.”