Bollywood Actress’s Mother Warn’s Kapil Sharma For Flirting With Daughter : कपिल शर्मा अनेकदा त्याच्या कार्यक्रमात चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी येणाऱ्या अभिनेत्रींसह चेष्टा, मस्करी, तसेच फ्लर्ट करत असतो. सध्या तो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चं सूत्रसंचालन करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. यावेळी त्यानं लोकप्रिय अभिनेत्रीसह फ्लर्ट केलं असताना तिच्या आईनं त्याबद्दल चक्क त्याला ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.
कपिल शर्माच्या कार्यक्रमात रक्षाबंधनानिमित्तच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, हुमा कुरेशी व तिचा भाऊ सकीब यांनी हजेरी लावली होती. त्यादरम्यान कपिल अभिनेत्रींशी गप्पा मारत होता आणि नेहमीप्रमाणे विनोद करत फ्लर्ट करत असताना तिथे हुमा कुरेशीची आईसुद्धा उपस्थित होती. त्यामुळे कपिलनं हुमासह फ्लर्ट केलं तेव्हा तिच्या आईनं त्याला ताकीद दिली.
अभिनेत्रीच्या आईने कपिल शर्माला दिली ताकीद
हुमाच्या आईशी संवाद साधताना कपिल गमतीत म्हणाला, “तुम्हाला माहीत आहे का हुमानं मला इतका वेळ वाट पाहायला लावली की, मी थेट लग्नच केलं”, त्यावर अभिनेत्रीच्या आई म्हणाल्या, “आज मी इथे आलीय. याचं कारण म्हणजे तू नेहमी माझ्या मुलीशी फ्लर्ट करीत असतोस. मी खूप मोठी राखी घेऊन आली आहे, जी हुमा तुला सगळ्यांसमोर बांधणार आहे.”
पुढे हुमाच्या आई कपिलला ताकीद देत म्हणाल्या, “तू लग्न केलं असलंस तरी तिनं तुला कायम भाऊच मानलं आहे आणि तू तिचा आदर करायला हवास. रक्षाबंधनानिमित्त माझ्यासमोर तिच्याकडून राखी बांधून घे. जर तू असं केलं नाहीस, तर माझे हात किती लागतात हे तू हुमा व साकीब या दोघांना विचारू शकतोस.” त्यावर कपिल हुमाकडे जाऊन गमतीत तिला म्हणाला, “गुंडी आहे तुझी आई.”
रक्षाबंधनच्या भागात कपिल शर्माला हुमा कुरेशीच्या आईनं गोड ताकीद दिल्यानंतर त्यांनी त्याचं पुढे कौतुकही केलं. त्या म्हणाल्या, “कपिल मी तुझी मोठी फॅन आहे. मी इथे फक्त तुझ्यासाठी आली आहे. मगाशी मी तुझी गंमत केली.”