आयफोन १५ लाँच झाला आहे. अनेक सेलिब्रिटी व खेळाडू या फोनबद्दल स्टोरी पोस्ट करताना दिसत आहेत. यावरून एका अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे. जे या फोनचं प्रमोश करतायत त्यांना फोन फुकटात मिळाला आहे का? असं या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत विचारलं आहे.

“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

गेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावर आयफोन १५ बद्दल सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत आहेत. यावरून ‘अलीबाबा: दास्तान ए काबुल’ फेम अभिनेता शिझान खानने एक स्टोरी पोस्ट केली आहे. “अॅपलने सेलिब्रिटींना आयफोन १५ फुकट वाटले आहेत का? की खरंच ते नवा फोन घेण्यास उत्सुक आहेत? नक्की काय चाललंय?” असा प्रश्न त्याने स्टोरी पोस्ट करत विचारला आहे.

sheezan khan post on iphone 15
शिझान खानची पोस्ट

करण जोहर, अर्जुन कपूर, रितेश देशमुख, मीरा राजपूत, रणवीर सिंग, आर माधवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आयफोन १५ बद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. आयफोन १५ हा मेड इन इंडिया फोन आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला आयफोन १५ सीरिज लाँच केल्यापासून या फोनची चांगलीच चर्चा आहे.

अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोअर्ससह ‘या’ प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार iPhone 15; आकर्षक ऑफर्स एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयफोन १५ सीरिजमधील बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये तर आयफोन १५ प्रो ची किंमत १,३४,९०० रुपयांपासून सुरु होते. किंमत जास्त असून देखील आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सना जास्त मागणी आहे. अनेक वेबसाइट्स आयफोन १५ च्या खरेदीवर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत.