Bigg Boss Marathi Fame Actress Jahnavi Killekar buys New Car : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘बिग बॉस’मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने प्रत्येक टास्क जिद्दीने परफॉर्म करत, महाअंतिम फेरी गाठली होती. शो संपल्यावरही तिची लोकप्रियता कायम आहे. आता अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने देखील नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. आपल्या नव्या गाडीची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सर्वांना दाखवली आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “My New Big Toy…My Butterfly” असं कॅप्शन दिलं आहे.

जान्हवी या व्हिडीओमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबासह गाडी खरेदी करायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ती नवीन कार घेण्यापूर्वी सगळ्या कागदपत्रांवर सह्या करते, यानंतर पतीच्या साथीने नव्या गाडीची पूजा करते. यावेळी जान्हवीचा मुलगा देखील उपस्थित होता.

अभिनेत्रीने ‘The Mahindra XUV700’ ही गाडी खरेदी केली आहे. या कारची किंमत फायनान्शियल एक्सप्रेसनुसार १३.९९ लाख ते २४.९९ लाख ( एक्स शोरुम ) एवढी आहे.

सध्या संपूर्ण कलाविश्वातून जान्हवीवर ( Jahnavi Killekar New Car ) कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत सावंत, पुष्कर जोग या कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, जान्हवी किल्लेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तिने काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली होती. याशिवाय नुकतीच ती सूरज चव्हाणच्या “वाजीव दादा” गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.